Type Here to Get Search Results !

ऐतिहासिक भवानी माता मंदिर : पहूरकरांचे श्रद्धास्थान वाघुर नदीच्या तीरावर वसलेल्या भवानी मातेने दरोडेखोरांना आंधळे केल्याची आख्यायिका !


दिशा लाईव्ह न्यूज- पहूर , ता . जामनेर ( शंकर भामेरे )  ----जामनेर तालुक्यातील पहूर  येथील  वाघुर नदीच्या तीरावर पहूर कसबे गावाच्या दक्षिणेला वसलेले जय भवानी मातेचे  जागृत देवस्थान  पहूर गावाचा ऐतिहासिक ठेवा असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे .

 पूर्वीच्या काळी दरोडेखोरांपासून देवी मातेने गावाचे संरक्षण करून दरोडेखोरांना आंधळे केल्याची आख्यायिका सांगितली जाते .       आज अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरू झालेल्या अश्विन नवरात्री उत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाईने सजले आहे .



पहूर कसबे प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर वाघुर नदीच्या पलीकडे गोमुख कुंडाजवळ हे जागृत देवस्थान आहे . 

सुमारे ३०० वर्षांपूर्वी पासून हे देवस्थान असल्याचे जाणकार सांगतात .  मंदिराची उभारणी चुना आणि विटांपासून केली असून सुमारे तीन फूट रुंदीच्या जाड भिंती  मंदिराच्या भक्कमतेची साक्ष देतात .

        मंदिराच्या उत्तरेला दगड आणि चून्यात बांधलेले चौरसाकृती गोमुख जलकुंड आहे .  आजही या गोमुखातून पावसाळ्यात पाणी वाहत असते . मात्र गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज गोमुखकुंड अखेरच्या घटका मोजत आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात व्याघ्रारुढ  भवानी मातेची  विलोभनीय मूर्ती  विराजीत आहे . 


पूर्वीच्या काळी येथे चैत्र नवरात्र उत्सवात यात्रा भरायची . बारा गाड्या उत्सव व्हायचा .मात्र आज हे उत्सव बंद पडले आहेत .गेल्या ३१ वर्षांपासून येथे घटस्थापना व नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे . लोकवर्गणीतून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे .मंदिरासमोर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे . 

पूर्वी मंदिराजवळ कवठाचे झाड होते . २००५ मध्ये महादेवाची पिंड आणि नंदीच्या  पुरातन मूर्ती विसर्जित करून नवीन मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली . 

विनायक बावस्कर , सुधाकर चौधरी , अशोक बावस्कर ,अनिल पाटील , अमोल बावस्कर , गोपाल बावस्कर , सचिन बावस्कर , उमेश बावस्कर यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे मंदिर विकासकामी सहकार्य मिळत आहे . नवसाला पावणारी जय भवानी माता पहुरकरांचे श्रद्धास्थान बनले आहे . नऊ दिवस मोठ्या भक्ती भावात भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात . देवीला खणा -नारळाची ओटी अर्पण करतात .


9881028027
9309918930


Post a Comment

0 Comments