दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . ३० ) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावात वाघुर नदीच्या पुलावर उभारण्यात आलेल्या फरशी पुलाला पुरामुळे पडलेले भगदाड कॉंक्रिटीकरण करून बुजण्यात येणार असून या कामास आज बुधवारी ( ता . ३० ) दुपारी सुरुवात करण्यात आली .
पहूर कसबे येथे वाघूर नदीवरील फरशी पुलास पोळ्याच्या दिवशी आलेल्या महापुराने मोठे भगदाड पडले होते . ग्रामपंचायतीने दोन वेळा मुरूम टाकून भगदाड बुजण्याचा प्रयत्न केला . मात्र वारंवार आलेल्या पुरांमुळे सदर मुरूम वाहून जात होता .
ग्रामपंचायतीने सदर भगदाड काँक्रिटीकरण करून बुजण्यात यावा यासाठी वेळोवेळी 'दिशा लाईव्ह न्यूज ' ने आवाज उठविला होता . दरम्यान पहूर कसबे ग्रामपंचायतीने आज सदर कामास सुरुवात केली . जेसीबी यंत्राच्या साह्याने पुलाचा कमकुवत भाग दुरुस्त करण्यात येत असून लवकरच काँक्रिटीकरण करून पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे .
तसेच पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापासून नेले नगरकडे जाणाऱ्या फरशी पुलाची दुर्दशा देखील संपुष्टात येणार असून या पुलावर सुद्धा आरसीसी जाळी टाकून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे .
https://youtu.be/S9tNWxRj8A4?si=zsxvq9g9Se4rWSW4
वरील व्हिडीओ बघण्यासाठी वरील लिंकला क्लीक करा.
Post a Comment
0 Comments