Type Here to Get Search Results !

दोघे गांजा तस्कर पहुर पोलिसांच्या जाळ्यात ! सव्वा लाखाचा ऐवज जप्त .पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले!!. यापुढे ही अवैध धंदे विरोधात सातत्य कायम असावे-नागरिकांची मागणी.


दिशा लाईव्ह न्यूज---शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( २ २ )  संशयास्पद वावरणाऱ्या दोन जणांना नाकाबंदी दरम्यान त्यांच्या मोटरसायकल वरील पिशवीची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली . 


          विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या राज्य आणि जिल्हा नाकाबंदीच्या आदेशानुसार सर्वत्र पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे .              

काल मंगळवारी ( ता . २२ )सायंकाळी सहाच्या  सुमारास शेंदुर्णीला नाकाबंदी दरम्यान एका मोटरसायकलवर दोन इसम काहीतरी संशयास्पद रित्या घेऊन जाताना मिळून आले. त्यांची सखोल चौकशी व पडताळणी केली 


 वीरमदेव परमा राठोड (वय २५ )व पिनू सिताराम चव्हाण (वय २८ ) रा . -लिहेतांडा ( ता . जामनेर )हे गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळले. त्यांचे ताब्यातील  ३ किलो १२० ग्रॅम गांजा व मोटार सायकल असा एकूण १ लाख १ २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आला . 


सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे,पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, दीपक सुरवाडे ,पोलीस अंमलदार विनोद पाटील, सागर गायकवाड, विजयकुमार पाटील, प्रशांत बडगुजर, गुलाब पवार यांनी केली . 


मागील आठवड्यात धुळे येथील देशी - विदेशी मद्य तस्कराच्या राष्ट्रीय महामार्गावरच पहूर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या होत्या .  पहूर पोलिसांच्या धडक कारवाईने तस्करांमध्ये खळबळ उडाली असून आता चोरी आणि अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.

 


सत्य तेच...जिल्ह्यातील एकमेव  न्यूज चॅनेल!!

सत्य,निर्भीड, बातम्यांसाठी-दिशा लाईव्ह न्यूज.


Post a Comment

0 Comments