Type Here to Get Search Results !

एम .एम .महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा विविध संघटना तर्फे सत्कार



दिशा लाईव्ह न्यूज -:-   पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व एम एम महाविद्यालय  पाचोरा      माजी विद्यार्थी महासंघ एम एम कॉलेज पाचोरा  तसेच पाचोरा तालुका व शहर तेली समाजातर्फे कॉलेजची माजी विद्यार्थिनी कुमारी योगिता रवींद्र चौधरी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नंदुरबार जिल्हा परिषद कनिष्ठ सहाय्यक आणि मंत्रालियन महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल तिचा आज विविध  संघटना तर्फे एम एम महाविद्यालयात मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ ,गुलाब पुष्प विचारवंतांची समाजसुधारकांची पुस्तक देऊन यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री  गो से हायस्कूल पाचोरा शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख होते. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री विलास जोशी, खालील देशमुख,  प्रा एस एस पाटील, कीर्ती बहुउद्देशीय संस्था धरणगाव अध्यक्ष सुनील चौधरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा .राजेंद्र चिंचोले ,प्रा .शांताराम चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले .

सत्कारास उत्तर देताना योगिता चौधरी म्हणाली की "कोणतेही यश हे जिद्द परिश्रम चिकाटी संघर्ष संयम याशिवाय मिळत नाही. दैववादी न बनता प्रयत्नवादी बनले पाहिजे ! परिस्थिती शी झुंज देण्याची तयारी ठेवली पाहिजे"  असे तिने विद्यार्थ्यांना सांगितले.

 "मी या संस्थेची माजी विद्यार्थिनी असल्याने मला संस्थेतील सर्व शिक्षक प्राध्यापक तसेच खालील देशमुख यांनी अनमोल सहकार्य केल्याबद्दल मी  त्या सर्वांचा ऋणी राहील "" असेही शेवटी योगिता चौधरी यांनी सांगितले.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खलील देशमुख ,संस्थेचे व्हॉइस  चेअरमन विलास जोशी ,ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी ,माजी प्राचार्य डॉ .बी एन पाटील ,उप प्राचार्य डॉ जे  व्ही पाटील ,उपप्राचार्य डॉ वासुदेव वले ,प्रा डॉ अतुल सूर्यवंशी, प्रा डॉ गोपाळ, प्रा एस एस पाटील, प्रा शांताराम चौधरी, प्रा जी बी पाटील, प्रा ए जे महाजन उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ. वासुदेव वले ,सूत्रसंचालन प्रा .डॉ अतुल सूर्यवंशी  यांनी ,तर आभार प्रा डॉ सुनिता मांडोळे यांनी केले.




Post a Comment

0 Comments