दिशा लाईव्ह न्यूज ---::---जूनियर चार्ली फाउंडेशनच्या माध्यमातून श्री सोमनाथ स्वभावणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुमित पंडित यांनी चार्ली चॅम्पियन च्या वेशभूषेध आपले ३ वर्षे पूर्ण केले आहे.त्यातच स्वभावणे यांनी ज्युनिअर चार्ली फाउंडेशन नावाने संस्थाही स्थापन केली आहे.या संस्थेअंतर्गत लोक कलावंतांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध कलागुणांना वाव देण्यासाठी चार्ली फाउंडेशन विविध क्षेत्रात काम करीत आहे
त्यांनी आत्तापर्यंत ३१ चार्ली तयार केले आहे.त्यांचा मानस आहे की १४३ चार्ली कलाकार व लोककला जपणाऱ्या व्यक्तींचा समूह व संच जमा करून समाजात नव्याने उभारी देण्याचे काम ज्युनिअर चार्ली फाउंडेशन करीत आहे.सोमनाथ व सुमित हि जोडी महाराष्ट्र भर फिरुन महाराष्ट्र शासनाच्या विविध सामाजिक विषयावर जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन जनजागृती करतात जसे की मतदान जनजागृती मोहिम,बेटि बचाव बेटि पढाओ,रस्ते वाहतुक सुरक्षा अभियान,व्यसनमुक्ती अभियान,स्वखर्चाने राबविण्यात येतात तसेच सुमित यांनी सामाजिक कार्यात ते गरिबांचा सिंघम म्हणुन ओळखले जातात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन.महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कारासाठि त्यांची निवड समितीतर्फे निवड करण्यात आली आहे.हा सोहळा साप्ताहिक औरंगाबाद युवा च्या १९ व्या वर्धमान दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.छ.संभाजीनगर येथे मोठ्या थाटात महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २१/१०/२०२४ रोजी सोमवारी संध्याकाळी ठीक ०७:१०.वा.स्थळ मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर रोड छ.संभाजीनगर येथे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
असे निवड समिती तर्फे पत्राद्वारे युवा चे संपादक अब्दुल कय्युम यांनी कळविले आहे.
ह्या पुरस्काराने ज्युनिअर चार्ली फाॅडेशन चे संस्थापक उप अध्यक्ष सुमित पंडीत यांचे सर्वस स्तरातुन कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments