सुनील लोहार, कुऱ्हाड ता. पाचोरा_ बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता झालेल्या अर्धा तासाच्या वादळी पावसामुळे कुऱ्हाड परिसरातील उमर्दे ,सार्व , जामने, वाकडी आदी भागात शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडलीत. शेतशिवरांमध्ये विजेचे खांब, तारा पडल्यात.
सुरुवातीपासून या परिसरात खरीप हंगामाची पीक परिस्थिती चांगली असताना बुधवारच्या झालेल्या वादळी पावसामुळे वेचणी वर आलेले कपाशी पीक तसेच मका, सोयाबीन आदी पिके जमिनीवर आडवी पडली. शेतकऱ्यांच्या वर्षभराचे आर्थिक चक्र ज्यावर अवलंबून असते तसेच पोटच्या लेकरांप्रमाणे जीव लावलेल्या कपाशी पिकाचे नुकसान पाहून शेतकऱ्यांना रडू कोसळले.
आजच्या झालेल्या नुकसानीमुळे पिकांना लागलेला खर्च देखील निघणार नसल्याची चिन्हे आहेत. या मतदार संघाचे आमदार तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी लक्ष घालून या परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments