दिशा लाईव्ह न्यूज, ( शंकर भामेरे ) पहूर , ता . जामनेर ( ता . २ १) जळगाव - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथील वाघुर नदीवर उभारण्यात आलेल्या दोन्ही पुलांचा परिसर बेशिस्तपणे लागलेल्या वाहनांमुळे 'अनधिकृत पार्किंग 'झोन बनत आहे . दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच चक्क पुलावरच रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी अनेकांनी आपली दुचाकी वाहने पार्क केली .
जामनेर तालुक्यातील पहुर येथे रविवारी आठवडे बाजार असतो . पहूर गावाला लागून वीस पंचवीस खेडी आहेत . सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडे बाजारात ग्रामीण भागातील ग्राहकांसह विक्रेत्यांची मोठी वर्दळ आढळून आली . तुडुंब गर्दी असल्याने अनेकांनी आपली दुचाकी वाहने पूल परिसरात पार्क केली तर काहींनी चक्क आपली वाहने पार्क करण्यासाठी पुलाचाच सहारा घेतला .
सध्या रस्ता अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे . असे असताना बिनदिकीतपणे वाहने पुलावर व पुलाच्या परिसरात पार्क करणे अत्यंत धोकेदायक आहे .
स्थानिक पोलिस प्रशासनासह वाहनधारकांनीही याविषयी गांभीर्याने विचार आवश्यक असल्याचे सुज्ञ नागरिकांनी सांगितले .
"पूलावर वाहने पार्क करणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखेच आहे . या परिसरात अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत .वाहन चालकांनी वाहने पार्क करताना अडथळा निर्माण होणार नाही , याची काळजी घ्यायला हवी .
ईश्वर हिवाळे ,
शहर उपाध्यक्ष , भ्रष्टाचार निर्मूलन समिती .
"बस स्थानक आणि पूल परिसरात रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही , याची काळजी घ्यावी . वाहन चालकांनी बेशिस्तपणे वाहने पार्क करू नयेत . वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची बाजाराच्या दिवशी पूल परिसरात नियुक्ती करण्यात येईल . "
सचिन सानप,पोलीस निरीक्षक ,पहूर पोलीस ठाणे.
Post a Comment
0 Comments