Type Here to Get Search Results !

पहूर ग्रामीण रुग्णालय ते श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर रस्त्याची झाली चाळण ! जागोजागी खड्डे ; वाहन चालकांची कसरत.अपघाताची शक्यता नाकारता येत नाही!! श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराजळ रस्ता दुभाजकाला स्वयंचलित सिग्नल बसविण्याची मागणी!! संबधीत अधिकारी लक्ष देतील काय??--


 दिशा लाईव्ह न्यूज ( शंकर भामेरे )  --::--   ता . जामनेर ( ता . ७ ) पहूर येथील ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे .

 रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोवर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे . ठिकठिकाणी जिवघेणे खड्डे पडले असून खड्डे चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . 


पहूर ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे .  या कामाअंतर्गत रस्ता  दुभाजक बनविण्यात आले आहेत.  तथापि रस्त्याच्या कामास अद्यापही गती आलेली नसल्याने वाहन चालकांसह स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

         सरकारी दवाखाना ते श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर या दरम्यान आर . टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , गुरांचा दवाखाना , पोलीस स्टेशन , १ ३ २ के .व्ही . महापारेषण केंद्र असे विविध शासकीय कार्यालये आहेत . मात्र रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी  कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही . सदर रस्ता भरवस्तीतून जात असल्याने नेहमीच पायी चालणाऱ्या नागरिकांची ही वर्दळ असते . 


श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराकडून पहूर गावाकडे जात असताना  महात्मा फुले महात्मा फुले तेलबिया संस्थेपासून  आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत वाहनांचा वेग प्रचंड असतो . येथे वळण रस्ता असल्याने आणि कोणतेही सूचनाफलक तथा गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही . 

       या मार्गावर नाली मंजूर झाली असली तरी मात्र प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही . परिणामी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते . 

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर असलेले दुभाजक धोकादायक बनले आहे . या दुभाजकावर वाहने धडकल्याने वारंवार अपघात घडत आहेत . हे अपघात टाळण्यासाठी या दुभाजकाची दुरुस्ती करून येथे स्वयंचलित सिग्नल बसविण्यात यावा अशी मागणी श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केली आहे .



संपर्क--::-9881028027
9309918930
जाहिराती आणि बातम्यांसाठी  ---दिशा लाईव्ह न्यूज

Post a Comment

0 Comments