दिशा लाईव्ह न्यूज- ( शंकर भामेरे -पहूर ,)--- ता . जामनेर ( ता . २ ) संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे कार्य केले जाते . मात्र या योजनेच्या निवड प्रक्रियेतून अनेक लाभार्थ्यांची नावे गहाळ झाल्याचा आरोप पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र घोंगडे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका संपर्क प्रमुख ईश्वर हिवाळे यांनी यांनी केला आहे .
अनेक वर्षांपासून महसूल विभागाकडे प्रकरण दाखल करूनही लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर होत नाहीत , लाभार्थ्यांना योग्य माहिती दिल्या जात नाही , या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रांची मागणी केली जात असल्याच्या तसेच गरजू लाभार्थ्यांना डावलून अपात्र अर्जदारांनाही योजनेचा लाभ दिल्या गेल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत .
गहाळ झालेल्या प्रकरणांसह बनावट कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ उकळणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची व त्यांना लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांची माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र घोंगडे , ईश्वर हिवाळे यांनी केली आहे .
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments