सुनील लोहार,-कुऱ्हाड
कुऱ्हाड खुर्द येथील पि एम श्री जिल्हा परिषद शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेश चे वाटप करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील दोन नंबर पटसंख्या असलेल्या या पी एम श्री शाळेत पहिली ते आठवी असे एकून 516 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे दरवर्षी मोफत गणवेश मिळत असतो. काल शासनामार्फत गणवेश उपलब्ध झाल्यानंतर आज सकाळी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत उपसरपंच कौतिक पाटील, शाळेचे उपाध्यक्ष समाधान पाटील,ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे,शालेय समिती सदस्य विष्णू माळी, विजय शेजूळ, चरण दुधे,रामराव देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पहिली ते आठवी चे विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल पाटील,ज्येष्ठ शिक्षक जितसिंग परदेशी,गणेश पाटील,विलास चौधरी,संजय काळे,प्रदीप जाधव ,प्रतिभा बडगुजर ,आदी शिक्षकांनी सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments