Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे टळले चुकीच्या जागेवर लावलेल्या रस्ता भूमिपूजनाच्या नामफलकाचे अनावरण एकाच ठिकाणी लावले होते दोन फलक.

 


 दिशा लाईव्ह न्यूज- शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १३) -जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रा मा १९नवी सांगवी - सांगवी - खर्चाणे ते लाखोली  या मार्गाच्या वर्गोन्नती नाम फलकाचे अनावरण माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असल्याचे नामफलक संबंधितांच्या चुकीमुळे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वारासमोर रोवण्यात आले होते . 


ही बाब श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सहसचिव शंकर रंगनाथ भामेरे , विश्वस्त किशोर काशिनाथ बनकर  तसेच  ईश्वर भगवान हिवाळे यांच्या निदर्शनास आली . त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता यांच्याशी तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून   यांच्या लक्षात आणून दिली . त्यांनीही लोकेशन चेक केले असता सदर फलक चुकीच्या ठिकाणी चुकून लावल्या गेले असल्याचे त्यांच्या ध्यानात आले . काही वेळातच उद्घाटन होणार असल्याने तात्काळ त्यांनी तो फलक काढून योग्य ठिकाणी रोवला व त्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले .


संबंधित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे . या रस्त्यांना ट्रस्टचा विरोध नाही ,  विरोध असण्याचे कारण नाही . परंतु काही लोक मात्र गैरसमज पसरवून ट्रस्टला बदनाम करण्याचे काम करत आहेत . कृपया सर्व नागरिकांनी असल्या अफवांपासून व अफवा पसरविणाऱ्यांपासून सावध  राहावे , असे विनम्र आवाहन श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सहसचिव शंकर रंगनाथ भामेरे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments