Type Here to Get Search Results !

चोऱ्यांचा फटका अन् लोडशेडिंगचा झटका 'पोलीस मित्र 'संकल्पना ठरू शकते प्रभावी ! पहूरकर हैराण ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान



                          दिशा लाईव्ह न्यूज

शंकर भामेरे ,पहूर , ता .  जामनेर ( ता . १ ) 

शेत शिवारात होणाऱ्या चोऱ्या आणि  लोड शेडिंग यामुळे पहुरकर पुरते हैराण झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .

            सध्या पहूर शिवारात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे . चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे . शेत शिवारात वीज पंप , वीजतारा , शेती उपयोगी अवजारे एवढेच नव्हे तर म्हशी देखील चोरून नेण्याची हिंमत चोरट्यांची वाढली आहे . 

वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग प्रचंड धास्तावलेला आहे . आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांशी संघर्ष करत शेतकरी बांधव शेतात रात्रंदिन कष्ट उपसत आहेत . चोरटे मात्र शेत शिवारात जाऊन डल्ला मारत आहेत . वेळोवेळी शेतकरी पोलिसांशी संपर्क करून तक्रारी देत आहेत मात्र काही केल्या चोऱ्यांना आळा बसत नसल्याने 

पोलिसांनी 'पोलीस मित्र ' संकल्पनेचा अवलंब करून चोऱ्यांना लगाम लावण्याचे काम करावे असा सुर जाणकारांमधून निघत आहे .

         सध्या नवरात्रीची चाहूल लागली आहे . मात्र सायंकाळी होणाऱ्या लोड शेडिंग मुळे ग्रामस्थ हैराण होत आहेत .

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आल्या असून लोडशेडिंग मुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ पाहत आहे .

 या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे .

Post a Comment

0 Comments