कृष्णा पाटील--प्रतिनिधी फत्तेपूर -तोरणाळे
दिशा लाईव्ह न्यूज --::-- सध्याच्या धावत्या युगाची परिस्थिती पाहून तसेच ऑनलाईन व मोबाईलच्या धावत्या युगाचा विचार डोळ्यासमोर घेऊन आपल्या सांस्कृतिक परंपरेला व महिलाच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी जळगाव येथे प्रथम भुलाबाई महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्ह्यातील अनेक संघांनी मोहोत्साहात सहभाग नोंदवला होता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह जळगाव येथे आयोजित केलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी तर्फे जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धेत तोरनाळे येथील काशिराम आनंदा विद्यालयच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे भुलाबाईची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हा वारसा नवीन पिढीत मुलींपर्यंत पोहोचविण्यासाठी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
स्पर्धकांनी मात्र जिल्हाभरातील अनेक उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या संघाला जळगाव येथील खासदार स्मिताताई वाघ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच हजार रू.बक्षीस देऊन गौरविण्यात आले ..
विजेत्या संघाला शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.पाटील सर व भाऊसाहेब एम.बी.पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ,तसेच शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्योती जयस्वाल, मनीषा पाटील, गजानन पाटील, गौरव पाटील, वादक धोंडू महाराज यांचे सहकार्य लाभले .
तसेच ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संस्थेचे चेअरमन सुपडूसिंग पाटील, व्हॉईसचेअरमन सरदारसिंग पाटील,सचिव प्रतापसिंग पाटील,जेष्ठ संचालक बाबुराव पाटील तसेच सर्व सन्माननिय संचालक मंडळ,शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक वर्ग ग्रामस्थ यांनी यशस्वी सांघाचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments