सुनील लोहार,कुऱ्हाड-प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह न्यूज। -:- ---कुऱ्हाड तालुका पाचोरा =कुऱ्हाड सह परिसरात यावर्षी वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बहरलेला होता .परंतु परतिच्या पावसाने यावर्षी खरीप हंगामाची वाट लावली.
त्यात कपाशी, मका ,सोयाबीन ,ज्वारी आदी पिकांची खूप नुकसान झाले आहे .काही ठिकाणी मका सोयाबीन पिकाला कोंब आले,काही ठिकाणी कपाशीचे फुटलेले बोंडे झाडावर लटकली असून, शेतात आहे तो माल जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे .बऱ्याच शेतकऱ्यांचा कपाशीचा पहिला वेचा मागील आठवड्यात दररोज होणाऱ्या पावसाच्या व मजुरांच्या कमतरतेमुळे झालेला नसून फुटलेला कापूस तसाच झाडावर लोंबकलेला आहे
. यामुळे मजुरअभावी शेतकऱ्यांची दिवाळी ही शेताच्या बांधावर साजरी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे . शेतकरी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन दिवसभर कपाशी वेचण्याचे काम करीत आहे.
कारण अती पावसाच्या फटक्याने जवळपास उत्पन्नात साठ टक्के घट येणार असून एक-दोन कापूस वेचणी केल्यानंतर पीक उपटावे लागणार आहे.यावर्षीच्या खरीप हंगामावर अतिवृष्टीने पाणी फिरले असून अनेक शेतकरी परिसरात दिवाळी संपल्यानंतर रब्बी हंगामासाठी पुन्हा सज्ज होणार आहे.
Post a Comment
0 Comments