Type Here to Get Search Results !

तोरणाळा येथे वीज वितरण कंपनी 33/11 के. व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन. अखेर तोरणाळ्यात गिरीश भाऊ महाजनांनी टिक्कम टाकलाच!




फत्तेपूर - तोरणाळे प्रतिनिधी-- कृष्णा पाटील.

जामनेर - तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव तसेच जनतेला होणारा त्रास पाहता आशियाई पायाभूत उभारणी गुंतवणूक बँक योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी शासनाकडून १२० कोटी रुपये मिळाले .


त्यापैकी जामनेर तालुक्यातील नऊ उपकेंद्रांसाठी ९० कोटी रुपये मा.ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने तालुक्यासाठी  घेतलेले असून सर्व कामांचे टेंडर ही झालेले आहेत व कामाला लवकरच सुरुवातही होणार असल्याचे त्यांनी भूमिपूजन प्रसंगी बोलताना सांगितले आहे .तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला सुरळीत वीज पुरवठा होईल अशाच पद्धतीने सर्वांनी जबाबदारी स्वीकारून काम करायची आहेत असेही ठेकेदारांना सांगितले .



यावेळी तालुक्यातून जे.के. चव्हाण रावसाहेब, विलाससिग राजपुत,नवलसिंग राजपुत,उप कार्यकारी अभियंता करेरा साहेब,कार्यकारी अभियंता तोमर साहेब, सह अभियंता जाधव साहेब भुसावल व गावातील सरपंच,उपसरपंच, माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,अनेक कार्यकर्ते तसेच परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments