पाचोरा :-अनिल आबा येवले
पाचोरा:सर्वत्र नवरात्र महोत्सव सुरू झाला असून पाचोरा शहरात विविध मंडळांच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये काल दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले लखन वाधवाणी नामक युवकाचा एका कार्यक्रमात गरबा खेळत असतांना अचानक चक्कर आल्याने सदर युवक जमिनीवर खाली अचानक पडल्याने तात्काळ काही सहकाऱ्यांच्या मदतीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु सदर इसमाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील रमेश वादवाणी यांचा हा मुलगा होता सदर लखन याचे वय २७ होते तो चाळीसगाव येथे पेट्रोल पंपावर खाजगी नोकरी करत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. व त्याचे वडील बूट चप्पलच्या दुकानात कामगार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या परिवारातील एकुलता एक मुलगा असलेला अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून पुढे आलेला हा युवक मागील वर्षी एका मंडळामध्ये दांडिया किंग देखील ठरला होता. परंतु नशिबाने त्याच्यासोबत जणू त्याच्यासोबत थट्टा केली असावी असे चित्र याठिकाणी निर्माण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच रुग्णालयामध्ये आमदार पुत्र सुमित पाटील त्याचबरोबर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलदादा शिंदे तसेच काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन दादा सोमवंशी माजी नगराध्यक्ष श्री संजय गोहिल, माजी नगर अध्यक्ष सौ .सुनीता ताई किशोर आप्पा पाटील, श्री प्रवीण पाटील, श्री आदित्य बिल्दिकर, श्री मनोज शांताराम पाटील ,श्री सुमित सावंत, श्री भूषण पेंढारकर, श्री जितेंद्र काळे ,श्री गुड्डू शेख, श्री धनराज पाटील तसेच सिंधी कॉलनी परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
तसेच या दुःखद घटनेमुळे जल्लोष दांडिया आज दिनांक 04/10/2024 रोजीचा कार्यक्रम रद्द केलेला आहे
Post a Comment
0 Comments