फत्तेपूर - तोरणाळे प्रतिनिधी -कृष्णा पाटील .मो.न. 7558382830
दिशा लाईव्ह न्यूज -:- नांद्रा हवेली ता. जामनेर येथील रहिवाशी ईश्वर दयाराम तायडे वय ५० यांनी दि. ८ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ईश्वर तायडे आपल्या पत्नीसह शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते .त्यातच घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी गावातील महिला सरपंच यांचा मुलगा नितीन रामचंद तायडे यांनी ईश्वर तायडे यांच्याकडून घरकुलाचे आमिष दाखवून १५ हजार रुपये घेऊनही घरकुल मिळत नाही, या संदर्भात ईश्वर तायडे व नितीन पाटील यांच्यात आपापसात अनेकदा वाद झाले .
त्यानंतर नितीन पाटील यांनी ईश्वर तायडे यांच्या विरोधात तक्रारी देऊन मानसिक त्रास व छळ केल्यामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलगा अमोल तायडे व पत्नी सुनंदाबाई तायडे यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला दिली असून,कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
https://youtu.be/lcLIGxraU1I?si=nTnVfhQu9RRB22sg
मयत ईश्वर तायडे यांच्या पत्नी सुनंदाबाई तायडे व मुलगा अमोल तायडे काय म्हणतात!
हे बघण्यासाठी वरील लिंकला दाबून क्लीक करा.
आणि व्हिडीओ बघा.
Post a Comment
0 Comments