Type Here to Get Search Results !

आगामी घट स्थापनेसाठी तुळजापूर येथे पायी ज्योत घेण्यासाठी कुऱ्हाड येथील भाविक रवाना!!


कुऱ्हाड प्रतिनिधी--सुनील लोहार 

कुऱ्हाड खुर्द येथील महाकलेश्वर मंदिर परिसरातील   जय बजरंग युवक मंडळाचे तरुण कार्यकर्ते दिनांक 28 रोजी शनिवारी रात्री आगामी घटस्थापनेच्या निमित्ताने पायी ज्योत घेण्यासाठी तुळजापूर येथे रवाना झालेत.



दरवर्षीप्रमाणे या वर्षीही  सलग चौथ्या वर्षाला तुळजापूर ते कुऱ्हाड पायी ज्योत घेण्यासाठी अनेक  भावीक भक्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात  जात असतात.



 तुळजाभवानीच्या मंदिरातून दर्शन घेत व ही ज्योत पेटवून सुमारे पाच दिवसाचा खडतर विना चपलेने प्रवास करीत ही  मशाल ज्योत रात्रंदिवस पायी चालत कुऱ्हाड येथे आणली जाते . 

गावाच्या वेशीवर ही ज्योत आणली असता बँड अथवा डीजे च्या तालावर ही ज्योत  मंडळापर्यंत वाजत गाजत आणली जाते.आणि अखंड ज्योत पेटवून नवरात्रीत नवदुर्गा मूर्ती समोर अखंड पेटवली जाते. यासाठी कुऱ्हाड परिसरतील अनेक कार्यकर्ते दरवर्षी परिश्रम घेत असतात.



https://youtu.be/csgUOpqqnFM


*सुपरहिट हिंदी गीत-- ताकी ओ ताकी ...या  किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या दमदार,सुपरहिट   गीतावर प्रथमच--*


*मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार  दादा कोंडके आणि उषा चव्हाण-*


*एक अनोखी भेट--दिशा मनोरंजन*


*आपल्याला नक्कीच आवडेल,बघा,लाईक करा.. आणि दिशा मनोरंजन वर मनसोक्त गीताचा आनंद घ्या*🙏🙏

Post a Comment

0 Comments