.
दिशा लाईव्ह न्यूज। ---:::--- वसतिगृह कर्मचाऱ्याच्या न्याय मागणीसाठी अनुदानित वसतिगृह कर्मचारी वेतनश्रेणी कृती समितीच्या वतीने दिनांक 23/09/2024 रोज सोमवार पासुन आझाद मैदान मुंबई येथे कर्मचारी यांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन चालू आहे.
गेल्या तीस वर्षांपासुन वेतनश्रेणीचा लढा सातत्याने विविध संघटनेच्या माध्यमातून दिला जातोय, पंरतु न्याय मिळत नाही.
दरम्यान संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22/11/2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संघटनेच्या शिष्टमंडळा समवेत झालेल्या बैठकीत मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करणे संबंधी निर्णय घेण्यात आला. परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित झालेला नाही.
दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेल्या आदेशाची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे जाहीर आश्वासन हजारो कर्मचाऱ्यांच्या समोर मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांनी दिले होते. मात्र अद्याप पूर्तता झाली नाही.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतलेल्या निर्णयाचो तात्काळ अमलबजावणी करून शासन आदेश काढावा या प्रमुख मागणीसाठी वेतनश्रेणी कृती समितीच्या वतीने प्रचंड बेमुदत धरणे अंदोलन करण्यात येणार आहे. तेंव्हा सर्व वसतिगृह कर्मचारी यांनी या आदोलनात सहभागी व्हावे ,असे आवाहन वेतनश्रेणी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments