Type Here to Get Search Results !

पहूर येथे आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आरक्षण प्रश्नी आदिवासी आक्रमक



 दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे पहूर , ता . जामनेर ( ता . ३०) आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतरांना समाविष्ट करू नये , त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना समाविष्ट करण्यासाठी गठीत केलेली समिती बरखास्त करून त्या समितीला दिलेले अधिकार रद्द करावेत यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  आज सोमवारी ( ता . ३० )आदिवासी समाज बांधवांनी  रस्ता रोको आंदोलन केले .



रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखल्या गेला .  त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती .  बस स्थानकाजवळ मोठ्या संख्येने परिसरातील आदिवासी समाज बांधवानी एकत्रित आले होते . यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने आदिवासी समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी ,  अन्यथा गाठ आदिवासी समाजाशी आहे असा इशारा आंदोलकांनी दिला .   




      पोलीस निरीक्षक सचिन सानप , उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

मंडळ अधिकारी मृणाल उंबरकर यांना आंदोलक फिरोज तडवी , गयास तडवी , राजू तडवी , सांडू तडवी , शब्बीर तडवी यांच्यासह  विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले . 

                    या संघटना झाल्या सहभागी


आदिवासी एकता विकास समिती  , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , बिरसा मुंडा क्रांतिवीर आदिवासी श्रमिक संघटना , महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद , एकलव्य क्रांती संघटना , तडवी आदिवासी एकता मंच , स्वर्गीय राम नाईक आदिवासी महासंघ , आदिवासी पारधी महासंघ या संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदविला .

Post a Comment

0 Comments