दिशा लाईव्ह न्यूज,शंकर भामेरे-पहूर , ता .जामनेर ( ता . ३० ) आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शहर शाखेतर्फे सोमवारी ( ता . ३० )पहूर -कसबे ग्रामपंचायत कार्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले .
उद्बोधन वर्गाचे अध्यक्षस्थान सरपंच अशाताई जाधव यांनी भूषविले . प्रारंभी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी केले .
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे ,ॲड .एस .आर .पाटील , माजी सरपंच लक्ष्मण गोरे , तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे आदींनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे सरपंच आशाताई जाधव यांना 'माहिती अधिकार अधिनियम - २००५ मार्गदर्शिका ' भेट देण्यात आली .ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर , माजी सरपंच शंकर जाधव , ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,शेरखा तडवी , दिनकर पवार , बाळू सुरडकर , सुभाष धनगर , ईश्वर बनकर , पुंडलिक लहासे ,देविदास धनगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सुत्रसंचालन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे यांनी केले . भारत माता पतसंस्थेचे व्यवस्थापक दीपक जाधव यांनी आभार मानले .
यशस्वीतेसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका संपर्कप्रमुख ईश्वर हिवाळे , सदस्य ज्ञानेश्वर बोरसे यांनी सहकार्य केले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments