Type Here to Get Search Results !

फुलंब्री रोडवर पडलेल्या २७ वर्षीय महिला व तीच्या २ वर्षीय मुलीच्या मदतीस धावली माणुसकी फुलंब्री पोलीसांनी केले मदतकार्य.. माणुसकी वृध्द सेवालय जटवाडा रोड सुमित पंडित यांच्या कडे पुनर्वसनासाठी केले दाखल.--माणुसकी ग्रुप-मायेचा खरा पाझर!!


दिशा लाईव्ह न्यूज  -:----सदर महिला हि फुलंब्री येथे खुलताबाद रोड वर फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोडच्या कडेला एका लहान २ वर्षाची मुली सह एक पीशवी घेवुन पडलेली होती .रात्री स्थानिक नागरिकांनी पोलीसांनी सदर महिलेची माहिती दिली असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सहाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेस महिला कर्मचारी यांनी विचारपूस केली.

 तर तीला बोलताहि येत नव्हते, तीच्या लहाण मुलीसह दिनांक २०-०९-२४ रोजी रात्री ०३:३० AM वाजता प्रथोमचाराकरीता शासकीय रुग्णालय घाटि संभाजीनगर येथे दाखल केले.


आज तीच्यावर उपचार पुर्ण झाले असता डॉक्टर यांनी रुग्णालयातुन सुट्टी दिली आहे.तीला ठेवायचे कुठे असा प्रश्न पडला पोलीस निरीक्षक साहणे यांनी बेवारस निराधार मनोरुग्ण यांच्या मदतीला धावनारे सुमित पंडित यांच्याशी संपर्क साधुन सदर महिलेची माहिती दिली. सुमित यांनी कागदोपत्री पुर्तता करुन रात्री उशिरापर्यंत पोलीसांच्या मदतीने महिलेस व तीच्या लहाण मुलीसह आपले माणुसकी वृध्द सेवालय येथे नेण्याचे ठरविले.

सध्या तीच्या नातेवाईक यांचा शोध लागेपर्यंत आपले माणुसकी वृध्द सेवालय धोपटेश्वर फाटा जटवाडा रोड येथील समाजसेवक सुमित पंडित यांच्या कडे तात्पुरते निवारा याकरिता तीच्या मुली सह दाखल केले आहे. 

माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालीका पुजा पंडित समाजसेविका यांनी सदर महिलेची विचारपुस केली असता सदर महिलेचे नाव:- वैशाली दिलीप पाचुरे वय २७ वर्ष राहणार :- ८० फुटि हायवे रोड धुळे येथील असल्याचे ती सांगत आहे. नवऱ्याने फारकती दिली आहे.तीला एक मुलगा व एक मुलगी आहे मुलगा नवऱ्याने घेतला तर मुलगी तीच्या सोबत राहते ती एकटि असल्याने वडिलांचे छत्र हरवीले आहे. आई व भाऊ आहे ते लक्ष देत नाही ,अश्या परिस्थिती फोनद्वारे  तीला एका तरुनाने लग्णाचे आमिश दाखवुन सिल्लोड येथे बोलविल्याचे ती सांगत आहे.  

तीची फसवनुक करुन संबंधित व्यक्ती पसार झाल्याचे तीने सांगितले.आता पुढिल देखरेख व तीच्या सध्याच्या पुनर्वसनासाठी माणुसकी टिम पुढे आली आहे.यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सहाणे साहेब,पोलीस उपनिरिक्षक वाघुले साहेब, पो.हे.का.जी जे काळे,राजु तेलगोटे साहेब,महिला पोलीस ममता गाढे,यांच्या मदतीने माणुसकी वृध्द सेवालय जटवाडा रोड येथे दाखल केले आहे.सदर महिलेच्या पुनर्वसनासाठी माणुसकी समुहाचे सुमित पंडित व पुजा पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली आहे व पुढिल तपास व नातेवाईकांचा शोध फुलंब्री  पोलीस करित आहे.

(ताज्या बातमी नुसार-ताईंना त्यांच्या भावाकडे स्वतः संवस्थेचे अध्यक्ष सुमित भाऊ पंडित यांनी स्वतः ताईंना तिकीट काढून गाडीत बसवले आहे.ते त्यांच्या भावाकडे निघाल्या आहेत. अशी  माहिती भाऊंनी दिली.)

द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.

आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत  सभासद नोंदणी चालू झाली आहे.

ज्या पत्रकार बांधवांना  सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.

9309918930

9881028027

Post a Comment

0 Comments