Type Here to Get Search Results !

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर महत्त्वाचा - शंकर भामेरे पहूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा !



 दिशा लाईव्ह न्यूज--शंकर भामेरे,पहूर .ता , जामनेर ( ता . २८ )भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे यांनी केले . येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन  जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते .


भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहिती अधिकार अत्यंत प्रभावी माध्यम आहे . माहिती अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो .

       आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक सुरेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जामनेर तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी शालेय ग्रंथालयाला माहिती अधिकार मार्गदर्शिका भेट देण्यात आली . मुख्याध्यापक सुरेश सोनवणे यांनी मौलिक मार्गदर्शन केले .संस्था प्रतिनिधी तथा वरिष्ठ लिपिक किशोर पाटील ,  ज्येष्ठ शिक्षक मधुकर आगारे , एस . एस  . पाटील , विजय बोरसे , गोपाळराव थोरात यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . आर .टी .देशमुख यांनी सूत्रसंचालन केले . 



महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला .प्रारंभी थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख , पर्यवेक्षिका कल्पना बनकर , ज्येष्ठ शिक्षक अमोल क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित  होते .  किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले भगवान जाधव यांनी आभार मानले .



द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.

आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत  सभासद नोंदणी चालू झाली आहे.

ज्या पत्रकार बांधवांना  सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.

9309918930

9881028027

Post a Comment

0 Comments