पहूर , ता . जामनेर दिशा लाईव्ह न्यूज( शंकर भामेरे ) - जामनेर तालुक्यातील पहूर गाव महाविद्यालयीन उच्च शिक्षणापासून आजही वंचितच असल्याची खंत माजी जिल्हा परिषद कृषी सभापती तथा नर्मदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप लोढा यांनी व्यक्त केली . ते म्हणाले , मंदिरांसाठी कोट्यावधींचा निधी खर्च करण्याबरोबरच पहूर गावात महाविद्यालयीन उच्च शिक्षणाची सुविधा सुरू होण्यासाठी सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे . शिक्षणाने गावाचा सर्वांगीण विकास होऊन गाव समृद्ध होते , असे सांगून ते म्हणाले की , येत्या पाच -दहा वर्षांमध्ये जर उच्च शिक्षणासाठी पहूर गावात महाविद्यालय सुरू झाले नाही , तर ते गावातील सर्वच राजकीय पुढार्यांचे अपयश असेल .
रविवारी ( ता . २९ ) नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक इंग्लिश स्कूलचा २१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी एमटीएस , ऑलंपियाड , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , अबॅकस आदी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह , मानपत्र , पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले . संस्थेतर्फे सर्व शिक्षिकांना स्नेहवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले .
पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते , ॲड . एस . आर . पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजमल भागवत , प्रमिला पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .
उपसरपंच शरद पांढरे , निवृत्त मुख्याध्यापक आर. बी .पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वासुदेव घोंगडे , ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील , ईश्वर बारी , उपाध्यक्ष तेजराज लुंकड , सचिव दीपक लोढा , श्यामराव सावळे , कैलास पाटील , अशोक घोंगडे , मोरसिंग नाईक , आर . टी . देशमुख , राजेंद्र सोनवणे , डॉ . काशिनाथ माळी , सामाजिक कार्यकर्ते ईश्वर घोंगडे , राजू जंटलमन , इब्राहिम शेख , संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण कुमावत , पत्रकार शंकर भामेरे विद्यार्थी ,शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सूत्रसंचालन मुख्याध्यापिका दिपाली नेमाडे , दिपाली पाटील यांनी केले .आभार वर्षा वैदकर यांनी मानले . यशस्वीतेसाठी लिपिक रामचंद्र चव्हाण , आसिफ पिंजारी , किरण भट आदींनी सहकार्य केले .
Post a Comment
0 Comments