Type Here to Get Search Results !

पहुर येथून चक्क कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी भांड्याचा संचच गायब!!!-पहूर येथे अजब प्रकार. ते ७ भांड्याचे संच गेले कुठे? गरिबांच्या साहित्यावर डल्ला मारनारा तो कोण?


दिशा लाईव्ह न्यूज - जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावातून चक्क कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी भांड्याचा संचच गायब झाल्याची जोरदार चर्चा पहुर परिसरात सुरू आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहुर येथील कामगारांना गृहपयोगी भांड्याचा संच घेण्यासाठी जळगाव किंवा इतरत्र जावे लागू नये, जाण्यायेण्याचा वेळ वाचावा व प्रवास भाडे वाचावे यासाठी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी भांड्याचा संचच पहुर येथे मिळावा यासाठी प्रयत्न केले व पहुर येथे कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी भांड्याचा संच मिळु लागला व वाटपही करण्यात आली.



पहुर कसबे गावातील माळी समाज मंगल कार्यालय येथे काही दिवसांपूर्वी कामगारांना मिळणाऱ्या गृहपयोगी भांड्याचा संच चे वाटप करण्यात आले.

 संच वाटप झाल्यानंतर जवळपास ७ भांड्याचे सच शिल्लक होते ते भांड्याचे संच दुसऱ्या दिवशी वाटप करण्यात येणार होते. त्यामुळे शिल्लक भांड्यांचे संच मंगल कार्यालयातील खोली मध्ये ठेवण्यात आले व खोलीला कुलूपही लावण्यात आले.

 मात्र सकाळी याठिकाणी काही पदाधिकारी गेले असता यातील एक भांड्याचा संच गायब झाला असल्याचे आढळून आले असल्याची चर्चा पहुर परिसरात सुरू आहे. त्यामुळे या भांड्याचा संच कोणी गायब केला ? बरं अज्ञात चोरट्याने हा संच चोरी केला असता तर या ठिकाणची कुलुप तुटलेली आढळली असती असेही सुज्ञ नागरिकांमधून बोलल्या जात आहे. मग हा भांड्याचा संच गायब करणारा कोण ?  असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.भांड्याचा संच गायब झाला असल्याची चर्चा पहुर परिसरात सुरू आहे. मग येथील भांड्याचा संच गायब झाला असल्याची तक्रार पहुर पोलीसात दाखल करण्यात आली आहेत का ? हे प्रकरण कोणी दाबण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना ? असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments