सुनील लोहार ,कुऱ्हाड
कुऱ्हाड तालुका पाचोरा कुऱ्हाड लोहारा जिल्हा परिषद गटा अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द भाजप शाखेतर्फे कामगार कल्याण मंडळातर्फे मोफत चार दिवसीय शिबिर येथील मंगल कार्यालयात पार पडले.
सध्या राज्यात कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कारागिरांना मोफत बांधकाम किट तसेच महिला वर्गांना मोफत स्टील भांडे कीट देण्याचा उपक्रम सुरू आहे .
त्याअनुषंगाने येथील मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून गेल्या चार दिवसापासून कुऱ्हाड येथे महिला व पुरुष बांधकाम कामगारांना नवीन नाव नोंदणी तसेच ज्यांनी अगोदर नाव नोंदणी केलेली असेल त्यांना संसार उपयोगी भांडे किट व बांधकाम साहित्य किट देण्यासाठी कामगार कल्याण कार्ड व कूपन देण्यात आले.
यावेळी एकूण 1022 महिला व पुरुषांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. मोफत भांडी वाटप व बांधकाम फिट हे आठ दिवसानंतर प्रत्येकाला मोफत देण्यात येणार आहे . नवीन नाव नोंदणी तसेच कार्ड घेण्यासाठी कुऱ्हाड लोहारां जिल्हा परिषद गटातून आलेल्या ग्रामस्थांना येथील भाजप गण प्रमुख जगदीश तेली यांच्याकडून मोफत भोजन देण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी जगदीश तेली, कौतिक पाटील, सुधाकर महाजन ,अरुण बोरसे, दिगंबर चौधरी ,विष्णू माळी ,चरण दुधे, प्रमोद महाजन व समाधान पाटील आदी भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments