Type Here to Get Search Results !

पहूरच्या गौरीचा राज्यस्तरावर गौरव तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई


 दिशा लाईव्ह न्यूज -शंकर भामेरे,पहूर ,   ता . जामनेर ( ३० ) येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या तायक्वांदोपटू

गौरी विजय कुमावत यांनी ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष राज्यस्तरीय  तायक्वांडो स्पर्धा सन २०२४-२५ लातुर येथे महिलांच्या  ७३ किलो आतील वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली .

        गौरी विजय कुमावत यांना बालपणापासूनच तायक्वांदो खेळाची आवड आहे . शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे .

मुलींनी खेळातून पुढे यावे ,  विशेषतः कराटे , तायक्वांदो खेळांचे प्रशिक्षण घेऊन मुलींनी स्वसंरक्षण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी 'दिशा लाईव्ह न्युज 'शी बोलताना सांगितले . गौरी कुमावत सध्या शेंदुर्णी येथील आचार्य गरुड कला ,   वाणिज्य ,  महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहेत . वडील विजय उर्फ भैया कुमावत हे त्यांना वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करीत असतात .

आज पर्यंत गौरी कुमावत यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून पदकांची मोठी कमाई केली आहे . त्यांच्या कामगिरीने पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे . त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे . दिशा लाईव्ह न्युज परिवारातर्फे गौरी कुमावत यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभकामना !

Post a Comment

0 Comments