दिशा लाईव्ह न्यूज (शंकर भामेरे, पहुर) येथील विश्वासाला पात्र ठरलेली भारत माता महिला पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २२ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्ष स्थानी सौ.मंगलाताई मधुकर पवार ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे तज्ञ सल्लागार श्री.मधुकर भास्कर पवार सर यांनी केले. तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. संस्थेच्या संचालक मंडळ , तज्ञ सल्लागार मंडळ , उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
सदरील अहवाल वर्षात संस्थेची सभासद, ठेवीदार, हितचिंतक,देशभक्त ,नेते मंडळी,पत्रकार,साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, संत-महंत, कीर्तनकार मयत झाले असतील , अशा थोर विभुतींना या सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेमार्फत इतर महत्त्वपूर्ण गुण गौरव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला.यात मा.श्री.शंकर रंगनाथ भामेरे सर,मानव हक्क संरक्षण समिती नवी दिल्ली जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल , मा.श्री.ईश्वर भगवान हिवाळे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती पहुर शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, मा.श्री.संतोष शहादु भडांगे सर यांनी २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शाळा स्तरावर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, मा.श्री.अविनाश पवार सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल,मा.श्री.किशोर प्रभाकर लहासे यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल, मा.श्री.पंढरी विठ्ठल बनकर यांची ठाणे जिल्हा पोलीस पदी निवड झाल्याबद्दल, मा.श्री.सचिन वसंत काकडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस पदी निवड झाल्याबद्दल,मा.श्री.रमेश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल, मा.श्री.वैभव थोरात यांची जळगाव पोलीस पदी निवड झाल्याबद्दल,मा.श्री.भुषण पंढरी द्राक्षे यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्या बद्दल,मा.श्री.हरिभाऊ भानुदास राऊत सर यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, मा.श्री.वासुदेव पंडित घोंगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर उपसभापती पदी निवड झाल्या बद्दल तसेच मा.श्रीसंपत सुकलाल कुमावत यांचे नातू आयुष कुमावत याची महाराष्ट्र क्रिकेट टी-ट्वेंटी मध्ये निवड झाल्याबद्दल या सर्वांना शाल,टोपी व मानचिन्ह देऊन संस्थेच्या संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थेमार्फत आर.टी.लेले हायस्कूल व जुनिअर कॉलेज पहुर या शाळेतील बारावी व दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच आर.बी.आर.कन्या शाळा पहुर या शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक श्री.दीपक गंगाराम जाधव यांनी वार्षिक सभेचे कामकाज सांभाळले. या सभेत संस्थेची आर्थिक पत्रके व विविध ठराव वाचून दाखवण्यात आले. या वार्षिक सभेत काही सभासदांनी शंका उपस्थित केले असता त्यांचे निरसन करण्यात आले.
या वार्षिक सभेत संस्थेची हितचिंतक माननीय श्री.राजधर दादा पांढरे व ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.शरद भाऊ बेलपत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या थकीत कर्जदारांवर कारवाई करून वसुलीची प्रक्रिया करावी आणि पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांची उपस्थिती ही जास्त असली पाहिजे. संस्थेने गावातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याच्या कार्यक्रमावर भर देण्यात यावा तसेच विविध क्षेत्रात नोकरीवर असलेल्या, सामाजिक कार्यात काम करत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात यावा तसेच महिलांसाठी संस्थेच्या वर्धापनदिनी हळदी कुंकूचा कार्यक्रम , आरोग्य विषयक कार्यक्रम, युवक व युवतींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात यावे,असे सुचविण्यात आले.
या सभेसाठी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.अशोक पंढरीनाथ पाटील , मा.श्री.समाधान पाटील,मा.श्री.प्रदीप साखरे, मा.श्री.शंकर घोंगडे, मा.श्री.शंकर जाधव, मा.श्री.दतु जाधव, मा.श्री.दिनकर पवार, मा.श्री.ज्ञानेश्वर लहासे, मा.श्री.लक्ष्मण गोरे, मा.श्री.बाबुराव आस्कर , मा.श्री.अशोक जाधव, मा.श्री.प्रभाकर पाटील, मा.श्री.अमृत वानखेडे, मा.श्री.भारत पाटील, मा.श्री.संतोष भडांगे सर व सदर संस्थेचे सभासद, हीत-चिंतक उपस्थित होते. यानंतर संस्थेचे तज्ञ सल्लागार मा.श्री.मधुकर भास्कर पवार सर यांनी आभार व्यक्त केले. नंतर नाश्ता व चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments