जामनेर : :- जामनेर येथे २६ रोजी दुपारी घरी कुणी नसतांना एकाने आत्महत्या केल्याने, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरात कोणीही नसताना एका 43 वर्षे इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील कस्तुरी नगर येथे उघडकीस आली असून या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल किशोर चतुर (वय ४३) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. राहुल चतुर यांनी घरात कुणीही नसताना राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी डॉ. प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. राहुल चतुर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहानगी मुलगी असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments