दिशा लाईव्ह न्यूज। -:- पंढरीनाथ माधवराव वाघमारे, वय ६५ वर्ष, संत गाडगे महाराज बेघर निवारागृह ,रेल्वे स्टेशन,छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मुला सह राहतात. ते अपंग आहेत आणि त्यांचा मुलगा मतीमंद आहे.तसेच त्यांना एक मुलगी देखील आहे. ती गेल्या ८ वर्षापासून मनोरुग्ण आहे.तीला उपचार कामी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे दाखल केले होते.परंतु तीला डॉक्टरांनी सुट्टी दिल्याने तीला आता ठेवायचे कुठे? असा प्रश्न पडला. रेल्वे स्टेशन येथील शहरी बेघर निवारागृहामध्ये फक्त पुरुषांना वास्तव्य करता येतं,महिलांना ठेवता येत नसल्याने शहरी बेघर केंद्राचे संचालक प्रा.प्रशांत दंदे व व्यवस्थापक आकाश बेलकर यांनी वेदांतनगर पोलीसांना मनोरुग्ण महिलेच्या पुनर्वसनासाठी मदत मागितली.
आज रोजी पंढरीनाथ वाघमारे यांनी पोस्टे.ला अर्ज दिला की, ते स्वतः अपंग असून त्यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे. तसेच त्यांचा मुलगा मतिमंद आहे.त्यांचे कुणीही नातेवाईक नसल्याने त्यांची मुलगी नामे भारती पंढरीनाथ वाघमारे, वय ३६ वर्ष ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने ठाणे मेंटल हॉस्पिटल ने तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती छत्रपती संभाजी नगर येथे परत आली.परंतु तिला राहण्यासाठी घर नसल्याने,तसेच तिचे कोणीही नातेवाईक नसल्याने,तिच्या सुरक्षेच्या व मानवतेच्या दृष्टीने तिचे पुनर्वसन होण्यासाठी योग्य कारवाई होण्याबाबत अर्ज दिल्यावरून श्रीमती प्रवीणा ताराचंद यादव पोलीस निरीक्षक वेदांतनगर यांनी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीच्या पुनर्वसनासाठी पुढे आल्या व मनोरुग्णासाठि काम करणार्याना सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित यांना सदर महिलेची माहिती दिली व पुणर्वसनासाठी सांगीतले असता माणुसकी समुहाच्या टिम ने तात्काळ मदतकार्यासाठि पुढे आले.
सुमित यांनी पोलीसांच्या मदतीने सदर महिलेस शासकीय रुग्णालय घाटि संभाजीनगर येथे प्रथोमचाराकरीता दाखल केले व प्रथोमचार करुन कागदोपत्री पुर्तता करुन सदर महिलेस आपले माणुसकी वृध्द सेवालय धोपटेश्वर फाटा जटवाडा रोड येथे अन्न वस्त्र निवारा याकरिता पुनर्वसनासाठी माणुसकी वृध्द सेवालयाच्या संचालीका पुजा पंडित यांनी जबाबदारी स्वीकारली व सदर महिलेस वेदांतनगर पोलीसांनी व माणुसकी समुहाच्या टिम ने मदतकार्य केले.
यात श्रीमती प्रवीणा ताराचंद यादव वरिष्ठ पोलिस निरीक्षक वेदांतनगर,संगीता गिरी पोलीस उपनिरीक्षक,पो.हे.का.देवकुमार सुर्यवंशी,पो.ह.वर्षा मुंढे,मनीषा दाभाडे,व शेख सलमा व माणुसकी समुहाचे सुमित पंडित,आकाश बेलकर,बोधी संस्थेच्या डॉ.रंजना प्रशात दंदे,वृध्दाश्रमाच्या संचालीका पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.
----------------------------------------------------
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली.
सदर महिलेला नातेवाईक सांभाळ करण्यास असक्षम असल्याने वेदांतनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये.बेघर निवाऱ्यात राहणाऱ्या त्या कुटुंबीयाची एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली
ती आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही,तर अजून कितीतरी असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात.आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत.तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल.आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.
----श्रीमती प्रवीणा ताराचंद यादव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक वेदांतनगर,
*********************************************
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments