Type Here to Get Search Results !

तेली समाजावर अन्याय होत असल्याची भावना तेली समाजातील नागरिकांचा शासनावर संताप!!!! खान्देश तेली समाज मंडळ लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार!


दिशा लाईव्ह न्यूज -:-  - संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणावर असून तेली समाजासाठी श्री संताजी महाराजांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी अनेक वर्षापासून तेली समाजाच्या वतीने विविध संस्था संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.तरी शासनाने त्या मागणीकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते.


आजपर्यंत अनेक सरकारे आलेत व गेलीत प्रत्येक सरकारकडे समाजाने ही मागणी केल्यावर सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.सर्वच पक्षांकडे तेली समाजाचे पदाधिकारी सक्रिय असून सुद्धा ही मागणी पूर्ण का होत नाही ? हा मोठा प्रश्न तेली समाजाला पडलेला आहे. छोट्या-छोट्या समाजांची स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे स्थापन केलेली असून कालच शासनाने ब्राह्मण समाजासाठी परशुराम तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली.


मात्र,तेली समाजाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे तेली समाजावर अन्याय होत असल्याची भावना प्रत्येक समाज बांधवांमध्ये निर्माण झाली असून समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र शासनाने व शासनातील सर्व प्रतिनिधींनी तेली समाजाच्या या मागणीकडे लक्ष केंद्रित करून तेली समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे.लवकरच याबाबतीत प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे देखील खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी,कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी,किशोर पुंडलिक चौधरी,चंद्रकांत श्रीराम चौधरी,अमोल हिरामण चौधरी,गजेंद्र फुलचंद चौधरी,शाम रामदास चौधरी,भाऊसाहेब चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.

Post a Comment

0 Comments