दिशा लाईव्ह न्यूज। ----:::::----कुऱ्हे पानाचे येथील आई प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवार दि. २२ रोजी राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयात शिक्षकांना शाल, बुके, सन्मान पत्र, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
आई प्रतिष्ठान ही नेहमीच गावातील विद्यार्थ्यांना तसेच तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवत असते. त्याचबरोबर गावातील शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळावी. या उद्देशाने जे शिक्षक शिक्षण क्षेत्राबरोबर गावातील विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतात. अशा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्याचे ठरविले आहे. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये दंगल काशिनाथ पाटील (पर्यवेक्षक, माध्यमिक स्कूल थोरगव्हाण), संगीता प्रकाश चौधरी (मुख्याध्यापिका, श्रीराम प्राथमिक विद्यामंदिर, कुऱ्हे पानाचे) व योगेश सुभाष गांधेले (राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे) यांचा समावेश आहे. याचबरोबर गावातील तलाठी विशाखा मून यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
काँग्रेसचे भटके मुक्त जमातीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर, भुसावळ येथील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, मंडळ अधिकारी विशाखा मून, कुऱ्हे पानाचे येथील श्री रेणुका माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर, सरपंच कविता प्रमोद उंबरकर, माजी जि प सदस्य समाधान पवार, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरविंद बावस्कर, उपाध्यक्ष अतुल पाटील, पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उंबरकर, आरती बडगुजर, रोहन पवार, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर यांनी तर सुत्रसंचालन व आभार आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरविंद बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संचालक घन:शाम बडगुजर, डी डी पाटील, मुख्याध्यापक एस पी चौधरी यांचे सहकार्य लाभले.
-----शिक्षक विद्यार्थी घडवतो तर जेष्ठांचे सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान : रजनी सावकारे.
शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव केल्यास निश्चितच भावी पिढी चांगली घडेल. तर सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी जेष्ठांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची असते. आमचे भुसावळ येथील प्रतिष्ठा महिला मंडळाचे कार्य हे जेष्ठ नागरिकांकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच आहे असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी रविवार दि. २२ रोजी कुऱ्हे पानाचे येथे आई प्रतिष्ठान तर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात केले.
आई प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद; सुधाकर बडगुजर
आई प्रतिष्ठान तर्फे गावातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावीत उल्लेखनीय यश संपादन करणारे, तसेच नवीन नोकरीला लागलेल्या तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून नेहमीच प्रोत्साहन देत असते व त्यांचा सत्कार करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी शिक्षकांनी सुद्धा आपल्या गावातील विद्यार्थी चांगला सुसंस्कारी घडावा, चांगला नागरिक घडावा. तसेच शिक्षकांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावे या उद्देशाने आदर्श शिक्षक पुरस्काराचे जो नवीन उपक्रम सुरू केला आहे हा कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments