Type Here to Get Search Results !

जि .प .शाळा शेरी ,ता. जामनेर येथील १६ विद्यार्थ्यांवर दंत चिकीत्सा


दिशा लाईव्ह न्यूज ( शंकर भामेरे )पहूर , ता . जामनेर ( ता . २ २) शेरी ( ता . जामनेर ) जिल्हा परिषद शाळेत  राष्ट्रीय बाल सुरक्षा  कार्यक्रमाअंतर्गत  दातांना कीड असलेले तसेच इतर दातांचे आजार आढळलेल्या १६ शालेय विद्यार्थ्यांना आशीर्वाद हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांना दातांचे आरोग्य व काळजी याविषयी डॉ मनीषा पाटील, डॉ विजया पाटील, डॉ मोनाली महाजन, डॉ श्रुती महाजन यांनी मार्गदर्शन केले.

दंतरोग चिकित्सक डॉ मनीषा पाटील व डॉ आशुतोष दोड यांनी मोफत व यशस्वी दंत उपचार केले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ विजया पाटील, डॉ धनंजय पाटील,डॉ आशुतोष दोड यांनी केले होते.

यावेळी विद्यार्थ्याना शहरातील विजयानंद हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल,आई हॉस्पिटल,महाजन हॉस्पिटल यांच्या तर्फे दंत सुरक्षा किट - टूथ ब्रश व पेस्ट यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ रमेश पाटील, मुख्याध्यापक गणेश राऊत, शिक्षक गोपाल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद बनकर यांसह पालक वर्ग उपस्थित होते.

प्रास्ताविक गणेश राऊत यांनी तर आभार गोपाल पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments