बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर. -:--- दि.१८/०९/०२४ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे .
महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,
मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात, त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे ,अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.
दिशा लाइव्ह न्यूज,एक सर्वोत्कृष्ट न्युज चॅनेल
ReplyDeleteसर्व वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवा!!
ReplyDelete