नवी मुंबई/श्री अनिल करंदकर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा परिसर स्वच्छ.
बाकी apmc मधील परिसर गलिच्छ.
Apmc च्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात आंदोलन.
माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने उद्या नवी मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून apmc मधील कांदा बटाटा मार्केटमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे याबद्दल सहजचं फेरफटका मारावा या उद्देशाने मनसेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहणी केली असता जिथे कार्यक्रम आहे तिथे नमुमनपा व apmc प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साफसफाई व स्वछता करण्यात आली.
याउलट याचं कार्यक्रमापासून अवघ्या काही फुटाच्या अंतरावर खुप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामधून डेंगू सारखे आजार झाल्याचे प्रकरण झालेली आहेत.
आणि अश्यात मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना डेंगूचे डास चावून त्यांना डेंगूची लागण होणे योग्य वाटतं नाही त्याचबरोबर apmc च्या बाहेरील काही लोकं सडलेले कांदे, बटाटे घेऊन शौचाल्याच्या पाण्याने साफ करत असल्याचे दिसून आले.
हा सर्व प्रकार धक्कादायक असून apmc ची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी आहे हे दिसून येते.
प्रशासनाकडे अजून 18 तास शिल्लक आहेत त्यांनी सर्व apmc ची अशीच स्वछता करावी अन्यथा उद्या मुख्यमंत्र्यांसमोर apmc प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनसे आंदोलन करेल.
यावेळी सहकार सेना उपाध्यक्ष,बाळासाहेब शिंदे, आश्विन गोळे,तुषार मराठे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments