दिशा लाईव्ह न्यूज। --::-- दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून राज्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचारी मुंबई येथे वेतनश्रेणी बाबत बेमुदत धरणे आंदोलन करणार असून शासनाने जोपर्यंत वेतनश्रेणी चा आदेश निर्गमित करत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन हे सुरूच राहणार असे कर्मचारी संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे
मागील महिन्यात नामदार शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्यव्यापी अधिवेशनात त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांना सांगून लवकरच आपणास वेतनश्रेणी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याअगोदर आमदार श्रीयुत बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महोदय यांनी शासकीय बैठक लावून अनुदानित वसतिगृह कर्मचारी वर्ग यांना वेतनश्रेणी देण्यासाठी आदेश निर्गमित करावे अश्या सूचना देखील दिला होता तसेच माजी समाजकल्याण मंत्री माननीय बबनराव घोलप साहेब यांनी देखील नाशिक येथे कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा घेऊन मुख्यमंत्री महोदय यांना वेतनश्रेणी बाबत घोषणा व्हावी याबाबत प्रयत्न केले होते परंतु शासन हे कुठे जुमानत नसून शेवटी कर्मचारी वर्गास बेमुदत धरणे आंदोलन बाबत निर्णय घ्यावा लागला
राज्यात एकूण 2388 वसतिगृह असून एकूण 8104 कर्मचारी आहे ते कर्मचारी आज वेठबिगारी सारख 24 तास काम करतात परंतु त्यांना शासनाकडून अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते शासनाच्या आदिवासी, सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा असून तेथिल कर्मचारी वर्गास वेतनश्रेणी व अनुदानित वसतिगृहात राबणारे कर्मचारी मानधनावर हा एक प्रकारे अन्यायच आहे काम सारखी मग दुजाभाव कसा काय? हा प्रश्न पडतो म्हणून आता शासनाला जाग यावी याकरिता हे हत्यार कर्मचारी वर्गानी उपसले असून राज्यातील बहुसंख्य कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनुदानित वसतिगृह कर्मचारी वेतनश्रेणी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments