बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.दि.०८/०१/०२४
सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री मा.ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मा.उपविभागीय अधिकारी, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, मा. तहसीलदार, मा.गटविकास अधिकारी व महसूल, महावितरण यांच्या समवेत सर्वच शासकीय विभागातील अधिकारी, व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड-सोयगांव तालुक्यातील सर्व गांवच्या समस्या सोडविण्यासाठीच्या सन 2023-24 च्या आमसभेत आज मी माझ्या अनाड गांवच्या विकासकामाबद्दलच्या सर्व अडचणी, समस्या, व प्रश्न मांडले व सर्वच प्रश्नांवरती केवळ समर्पक उत्तरेच मिळाली नाहीत तर ती तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांवर अंमलबजावणी सुरु केली... हे आमसभेचे खास वैशिष्ट्य
1) अनाड गांवच्या गट नंबर 153 च्या शिवारात भव्य जलप्रकल्प उभारला जावा.
2) अनाड ते तोंडापूर (खान्देश) ला जोडणारा 7 किमीचा घाट रस्ता वन विभागाकडून रीतसर परवानगी घेऊन तात्काळ बनवावा.
3) अनाड-अजिंठा रोडवरील देशी दारुचे दुकान तात्काळ बंद करावे.
4) बरडवस्तीवरील मंजूर झालेली विहीरीचे थांबलेले काम तात्काळ सुरु करावे.
5) भटके जोशी सामाजिक सभागृह व मातंग समाज व जोशी समाज स्मशानभूमीची मंजूर झालेली कामे तात्काळ सुरु करावी
6) अनाड गांवच्या सर्वसमावेशक असलेल्या विविध विकासकामांसाठी रुपये 01 कोटींचा निधी द्यावा.
ही सर्व प्रश्न मी आज अनाड ग्रामपंचायतच्या वतीने मांडली व आमसभेच्या माध्यमातून शासन-प्रशासन सर्वच एका ठिकाणी असल्याने ही सर्व प्रश्न तात्काळच सुटतील यांत तीळमात्र शंका नाही.
Post a Comment
0 Comments