जळगाव -:- दि6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा काल पत्रकार दिनी करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी प्रमोद अण्णा पाटील (कासोदा) यांची तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भिकाभाऊ चौधरी (पारोळा) यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
याशिवाय कार्याध्यक्ष पांडुरंग महाले, सरचिटणीस- दिलीप शिरुडे, खजिनदार फारुख शेख तर सहचिटणीस शब्बीर सैय्यद यांचीही निवड करण्यात आली. जळगाव महानगर अध्यक्षपदी विवेक खडसे यांची एकमताने निवड झाली. जिल्हा उपाध्यक्षपदी चरणसिंग पाटील, मनोज बारी, सचिन सोमवंशी यांचीही निवड करण्यात आली. पत्रकार भवन समितीच्या अध्यक्षपदी अजितदादा नांदेडकर तर सचिवपदी सारंग भाटिया यांची तर जामनेर तालुकाध्यक्षपदी तेजमल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पत्रकार संघाच्या आरोग्य समिती अध्यक्षपदी मुकुंद गोसावी तर सचिवपदी डॉ. नितीन धांडे यांची नियुक्ती झाली आहे.
पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील व कार्यवाहक अशोकजी भाटिया यांच्याहस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व निवड झाली. तसेच एरंडोल तालुकाध्यक्षपदी बी. एन. चौधरी यांची निवड करून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment
0 Comments