प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी तरुणांना संबोधित करताना म्हणाले की, आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. गुलामगिरीच्या काळात भारताला नवी ऊर्जा प्रदान करणाऱ्या थोर महापुरुषाला हा दिवस समर्पित आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा.
देशाच्या तरुणाईच्या खांद्यावर भारताला एका नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. तरुणांच्या शक्तीमुळेच भारत आज जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे. सरकारने मागील 10 वर्षांत तरुणांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या. या संधीच्या जोरांवर तरुणांनी देशाला पुढे घेऊन जावे. ते हे पूर्ण ताकदीने करतील असा मला ठाम विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.
स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जनतेला 22 जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिर व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचेही आवाहन केले. जनतेने 22 जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी. तिथे श्रमदान करावे. आज मलाही काळाराम मंदिराला भेट देण्याची व तिथे श्रमदान करण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.
यावेळी मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नागरी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सन्मानिय आमदार,खासदार,क्रीडा सचिव, अधिकारी सह मोठ्या संख्येने नागरिक व युवा उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments