येणारे गुणवंत क्षिरसागर यांचे काल दि.2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कळमसरा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर
एक वळणावर मोटरसायकल व चारचाकी (दूध वाहन ) यांच्या धडक होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलाने त्यांना अग्निदाग दिला,या वेळी आपल्या लाडक्या गुणवंतास शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या जनसमुदाय उपस्थित होता.लोहारा पंचक्रोशीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काल सकाळी झालेला अपघात खूपच भीषण होता.घटनास्थळी प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होते. गावात घटनेची माहिती मिळताच केवळ काही तासात लोहारा गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली,घटना घडल्यानंतर पोलीस लागलीच तिथे जायला पाहिजे होते,लोहारा गावापासून केवळ 10 मिनिटांचे अंतर होते, मात्र घटनास्थळी पोलिस उशिरा पोहचल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
लोहारा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळेस कर्मचारी गैरहजर असतात, तसेच खूपच कमी पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टॉप आहे.तर लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 18 खेडे आहेत. परिसर मोठा आणि पोलिस कर्मचारी कमी त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी येतात..लोहारा येथे किमान 5 ते 7 पोलीस कर्मचारी नेहमी हजर पाहिजे, कित्येक वेळा तशी मागणी झाली आहे.मात्र उच्चस्तरीय अधिकारी हे गंभीर प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येतंय.
काल अपघातात दुःखद निधन झालेल्या गुणवंत क्षिरसागर यांचा अपघात हा परिसरातील जनतेला चटका लावून गेला..शांत,सुस्वभावी, हुशार अस व्यक्तिमत्त्व होत, गुणवंत हा खरोखरच गुणवंत होता..नेहमी सामाजिक कार्यात ते अग्रेसर असायचे.गावाची,आणि समाजाची खूप मोठी हानी झाली आहे.तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांचा आत्म्यास चिरशांती देवो,
त्यांच्या पच्यात वडील दत्तात्रय भिका क्षिरसागर, आई, भाऊ, पत्नी,काका ,1 मुलगा,1 मुलगी असा मोठा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments