सालाबादप्रमाणे पत्रकार दिन पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात येणार असुन दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा पत्रकार संघ सभासदाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील राहणार आहेत. तसेच दिनांक ६ जानेवारी २०२४ पत्रकार दिन कार्यक्रमास महनीय वक्ते म्हणून श्री आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांचे प्रशासन व पत्रकारिता या विषयावर संबोधन करतील व श्री संदीप घोरपडे अमळनेर हे आजची पत्रकारिता या विषयावर संबोधतील तर प्रमुख पाहुणे खा. उन्मेष दादा पाटील, खासदार, आ. राजू मामा भोळे , सौ. सिमाताई भोळे माजी महापौर, श्री गुलाबराव देवकर माजी मंत्री , श्री सतीश अण्णा पाटील माजी मंत्री, श्री रजनिकांत भाई कोठारी उद्योगपती हे उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार संघास ६० वर्ष पूर्ण होत असुन, २०२४ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात येईल त्या निमित्ताने जिल्ह्यतील स्मरणिका व हिरक महोत्सवा निमित्त विविध क्र्यक्रमाची घोषणा येणार आहे. जिल्हातील सर्व पत्रकारांनी स्मरणिकेत परिचय यावा यासाठी आपला परिचय दोन फोटो व आपले ओळखपत्र झेरोक्स सोबत आणावी. या स्मरणिकेत पत्रकारीतेत ज्यांचे योगदान आहे असे सर्वांनी सहभाग घ्यावा. जेणे करून आपला परिचय स्मरणिकेत येईल पत्रकार दिन कार्यक्रमाला आखणी करण्यात येणार आहे . सोबतच पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर व रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे करण्यात आले आहे.
--------------------------------------------------/----------------
Post a Comment
0 Comments