जन जागॄती जागृती सेवा संस्था, ठाणे यांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार साप्ताहिक सखी मंच संपादिका सौ.वैशाली चौधरी (धुळे ) यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर व सचिव संचिता भंडारी यांनी जाहीर केला.
स्तंभलेखक, वृत्तपत्र लेखक, संपादक, साहित्यिक, लेखक, पत्रकार, कवी, मुक्त पत्रकार तसेच विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिनी, आकाशवाणी, युट्यूव चैनल, पोर्टल अशा विविध प्रिंट / इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे करत आहात. सध्याच्या युगात संपादकांना वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्यासाठी व जाहीरातींसाठी झगडावे लागत आहे. या संगणकीय युगात, महागाईची झळ सोसून स्वखर्चाने मासिक / पाक्षिक / साप्ताहिक / दैनिकातून समाजजागृती करण्याचे महत्कार्य आपण करत आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या या सेवाभावी सत्कार्याची दखल घेऊन आपणास पत्रकारितेतील हे मानाचे 'सन्मानपत्र' देताना आम्हाला आनंद होत आहे. आपले कार्य नवोदित पत्रकारांसाठी निश्चितच प्रेरणदायी आहे. आपल्यासारख्या निःस्पृह आणि निर्भिड पत्रकारांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कम आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्या आपणांसारख्या पत्रकारांच्या सामर्थ्यवान लेखणीला आणखी बलशाली करण्याच्या उदात्त हेतूनेच यथोचित सन्मान करण्यात येत आहे. साप्ताहिक सखी मंच संपादिका सौ. वैशाली नरेंद्र चौधरी या विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी विभागीय कार्याध्यक्ष म्हणूनही त्या काम पाहतात त्यांना जाहीर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
------------------------------------------------------------------------
Post a Comment
0 Comments