Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील प्रा .सी एन चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारा साठी निवड!!



पाचोरा ( अनिल आबा येवले) :-: पाचोरा येथील पीटीसी संस्थेच्या एम एम कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व  सकाळचे पत्रकार सी एन चौधरी सर यांची नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थान तर्फे उत्तर महाराष्ट्र स्तरीय उत्कृष्ट पत्रकार म्हणून निवड झाली असून पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी त्यांना नाशिक येथे सन्मानपुर्वक पुरस्कार दिला जाणार आहे .

पाचोरा येथे गेल्या  40 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करणारे अनुभवी व अभ्यासू पत्रकार म्हणून प्राध्यापक सी एन चौधरी सर यांची ओळख असून त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक धार्मिक कौटुंबिक तसेच राजकीय जीवनातील अनेक चांगल्या सुख दुःखाच्या बातम्या लावून आपली पाचोरा तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . 

प्राध्यापक सी एन चौधरी सर म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व . जबरदस्त लिखाण . प्रत्येक व्यक्तीबद्दल व्यक्तिगत माहिती . उत्कृष्ट लिखाण उत्कृष्ट सूत्रसंचालन हजरजबाबी नवरत्नां पैकी एक रत्न असलेले पत्रकार म्हणून ख्याती आहे . कधीही कोणाच्या भावना न दुखावणारे . पत्रकार क्षेत्रातील चांगले व्यक्तिमत्व . त्यांच्या अनेक चांगल्या बातमीची दखल घेऊन नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्या तर्फे पत्रकार दिनानिमित्त कै कृष्णराव पाटील कोठावळे यांच्या स्मृती दिनानिमित्त 5 जानेवारी रोजी पुरस्कार देण्यात येणार आहे.उत्तर महाराष्ट्र स्तरीय हा पुरस्कार असून पाचोरा तालुक्या तुन प्राध्यापक सी एन चौधरी सर यांची एकमेव निवड झाली असून  पाच जानेवारीला पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे . हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री माननीय सुरेश भटेवरा यांच्या हस्ते देण्यात येणार असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन व अध्यक्ष श्री कालिका संस्थान मंदिरचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील व श्री रवींद्र नाईक हे करणार असून या पुरस्कारा बद्दल पाचोरा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे  तसेच लोहारा वेबमिडिया असो. लोहारा शहर पत्रकार मंच  तर्फे  आदरणीय प्रा सी एन चौधरी यांचे  मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;:::::::::::::::::::::::::::::



Post a Comment

0 Comments