Type Here to Get Search Results !

सिलबंद औषधीमध्ये निघतेय अळी:अक्कलकुवा तालुक्यातील प्रकार खापर व पिंपळखुटा येथे एझिथ्रोमायसिन औषधीची ग्रामस्थांकडून तक्रारq


डॉ.पंकज सूर्यवंशी,खापर - यांजकडून

      नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य  व्यवस्था व बालमृत्यू विषयी आमदार आमश्या पाडवी विधानपरिषदेत निरंतर मुद्दे उपस्थित करीत आहे,तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिले जाणारे प्रतिजैविक औषधीमध्ये (अँटिबायोटिक) चक्क अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे.

        खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लहान मुलांना दिले जाणाऱ्या प्रतिजैविक औषधीमध्ये (अँटिबायोटिक) अळी निघत असल्याची माहिती मिळताच आमदार आमश्या पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन सदर औषधींची पाहणी केली.त्यात २१ डिसेंबर रोजी आलेल्या औषधींच्या साठ्यातील बॅच क्र.जी.४२/५०४५ एल्फिन ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सिरपमध्ये अळी असल्याचे निदर्शनास आले.२१ डिसेंबर रोजी आलेल्या या औषधीच्या २०० बॉटल साठ्यापैकी ४२ बॉटल वाटप न करता विभक्त करून ठेवण्यात आले.


आमदार आमश्या पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश वसावे यांना सदर प्रकरणांची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले असून आ.पाडवी स्वतः याविषयी उच्चस्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपसरपंच ललित जाट,ग्रामपंचायत सदस्य शोएब तेली,शिवसेना कार्यकर्ता रवी पाडवी,संतोष पवार आदीं उपस्थित होते.

लहान मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जाणारे (अँटिबायोटिक) एझिथ्रोमायसिन सिरप यांत दि.०६ जानेवारी रोजी अळी आढळून येत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सहकारी वैद्यकीय अधिकारी यांनी औषधनिर्माण अधिकारी यांना कळवले,व नंतर त्या औषधीचा साठा दि.०६ जानेवारी रोजी पासून वाटप करण्यात आलेला नाही.


तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून दि.०६ जानेवारीला सदर औषधीसंदर्भात इतर ठिकाणी तक्रार येत असल्याचे पत्र आल्याने एझिथ्रोमायसिन सिरप देणे बंद केलेले होते. तसेच दि.०६ जानेवारी नंतर खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही रुग्णाला ही औषधी देण्यात आलेली नाही. :-:  डॉ.निलेश वसावे*- वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,खापर.


खापर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य शोएब तेली यांनी त्यांच्या मुलांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन  देण्यात आलेली एझिथ्रोमायसिन (अँटिबायोटिक) औषधींमध्ये अळी आढळल्याची तक्रार माझ्याकडे  केली असता ,मी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली व त्या औषधींची पाहणी केली असता,त्या औषधीच्या इतर बॉटलमध्ये देखील अळी आढळून आली.तरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश वसावे यांना याविषयी कळवून यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधित सहवैद्यकीय अधिकारी व औषधनिर्माण अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे सांगितले.तरी यांची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा औषधीय साठा जप्त करून नष्ट करावा.तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासंदर्भात उच्चस्तरावर तक्रार करणार आहे. :-: आमश्या पाडवी ,विधानपरिषद आमदार महाराष्ट्र

फोटो-१)खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीची पाहणी करतांना आमदार आमश्या पाडवी सोबत युवासेना जिल्हाप्रमुख ललितकुमार जाट, ग्रामपंचायत सदस्य शोएब तेली,शिवसेना कार्यकर्ते रवी पाडवी,संतोष पवार आदीं.

२)लहान मुलांना दिले जाणाऱ्या एझिथ्रोमायसिन औषधीत निघालेले अळी.

Post a Comment

0 Comments