Type Here to Get Search Results !

हिट अँड रन कायदा रद्द करावा यासाठी जय संघर्ष वाहन चालक चालक-मालक संघटनेतर्फे पाचोरा शहरात भव्य रॅली काढून शासनाच्या निषेध.

 


दि 1/1/2024/ पाचोरा येथे हिट अँड रन कायदा रद्द करावा यासाठी जय संघर्ष वाहन चालक चालक-मालक संघटनेतर्फे पाचोरा शहरात भव्य रॅली काढून शासनाच्या निषेध केला व जारगाव चौफुली ते तहसील कार्यालय असं जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करत ड्रायव्हर लोकांनी घोषणा देत पाचोरा शहर ड्रायव्हर कायदा रद्द करा व ड्रायव्हर संरक्षण कायदा आन

नावा अशा घोषणा देत दणाणून सोडले होते जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले की ड्रायव्हर विरोधी जो कायदा आणला आहे हा ड्रायव्हरच्या भल्याचा नसून हा त्यांच्या मुळावर उठलेला कायदा आहे जर का अपघात झाला तर ड्रायव्हरला दहा वर्ष कारावास व सात लाखाचा दंड हा काळा पाण्याचा कायदा रद्द करावा या साठी जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करत वाहन चालकांनी रोष व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण वाघ ,खान्देश सहकार्य अध्यक्ष योगेश पवार ,पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,बस विभागाचे अध्यक्ष उत्तम बोरसे ,पाचोरा शहराध्यक्ष दिपक पवार व स्थानिक ऐकता रिक्षा युनियन चे अध्यक्ष एकनाथ सदाशिव,नाना चौधरी,अशोक निंबाळकर,व अवजड विभाग व सर्व संघटनांनी व वाहन चालक मालक बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments