धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारा संचलित डॉ जे .जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस व बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील विद्यालयाच्या उपमुख्यद्यापिका यु डी शेळके मॅडम होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून लोहारा येथील रुग्णालयातील लॅब असिस्टंट समाधान पाटील व अविनाश नेटके उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे सर यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले च्या शैक्षणिक जीवनाविषयीची माहिती दिली. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी गीते सुद्धा सादर केली यावेळेस बालिका दिन म्हणून साजरा करताना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थिनीचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांना मुलींना शिक्षण देताना कशा प्रकारे संघर्ष करावा लागला याविषयीची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार मानले.
Post a Comment
0 Comments