सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करन्यात आली समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि.पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण त्या काळात सन १८४८ मध्ये केलेला.स्त्री ला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या एका क्रांतीज्योतीने इतिहास घडविलाय.शिक्षणा पासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या समाजात सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळा उघडल्या.जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी बालिका वसतीगृह सुरू केले.हे कर्तुत्व होते देशातील पहिली महिला शिक्षिका ठरलेल्या सावित्रीबाई फुलेंचे. त्यांची आज जयंती व बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते म्हणून ३ जानेवारी हा दिवस 'बालिका दिन' म्हणून पण साजरा केला जातो.तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली.स्वयंभू समाजसेवेचे व्रत स्विकारलेल्या सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तो प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले.जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने. अश्या ह्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.उपस्थित सर्वानीं पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करन्यात आली.यावेळी माणुसकी समुहाच्या वतीने बालिका दिनानिमित्त उपस्थीत महिलांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला महिला सरपंच अंजना धनंजय वैष्णव,सविता शिवाजी नलावडे,ज्योती गजानन तारे.ग्रा.सदस्य व माजी सरपंच पुनम चव्हाण,धनंजय वैष्णव,गजानन तारे,लक्ष्मण बुंदेले,कारभारी पा.रोठे, लक्ष्मण चव्हाण,अर्जुन चव्हाण,सुनिल चव्हाण, सद्दाम सेठ,नर्सिंग चव्हाण, सुभाष चव्हाण,अमोल वाघ ,समाजसेवक सुमित पंडित,,पुजा पंडित,लक्ष्मी पंडित,सह माणुसकी वृध्दाश्रमातील वृध आदि उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments