गेल्या काही दिवसांपासून जिल्यात अवैध धंदे,चोरी,दरोडे,खून,अपघात यांचे प्रमाण वाढले आहे.अशीच चोरीची धाडशी घटना जामनेर तालुक्यातील नेरी येथील डॉ. अशोक पांडव यांचे घर व हॉस्पिटल फोडल्याची घटना नेरी येथे घडली असून, अज्ञात चोरट्यांनी 75 हजार रुपये रोकड, व सोन्याचे ४० हजार किंमतीचे दागिने लंपास केले असुन अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी येथील प्रतिष्ठित डॉक्टर अशोक विठ्ठल पांडव यांचे घर व हॉस्पिटल एकाच जागेत आहे. डॉक्टर पांडव हे बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधीचा फायदा घेत रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉस्पिटल व घरच्या दरवाजांचा कडी कोंडा तोडून घरात शिरले व दागिने रोकड पैसे घेऊन पसार झाले. सकाळी कामावर आलेल्या कामगारांचे निदर्शनात आले की घराची कडी कोंडे तुटलेले होते त्यावरून ही घटना उघडकीस आली घरातून रोकड ७५
हजार रुपये द ४० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी गेल्याचे चौकशी समोर आले आहे. घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया साहित्याची तोडफोड चोरट्यांनी केली असुन जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे कर्मचारी अतुल पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली ठसेतज्ञ पथकांनी घटनास्थळी ठशांचे नमुने घेतले असून लवकरात लवकर या चोरट्यांचा तपास लावून यांना जेलबंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरीकां मधून होत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे. राहुल पांडव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Post a Comment
0 Comments