शांताराम चौधरीसर,पाचोरा.
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे तेली समाज बांधव व ग्रामस्थांतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात येथील मंदिरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय पाचोरा शहर तेली समाजाचे सचिव श्री शांताराम चौधरी सर यांनी करून दिला. त्यांनी संतूचा संताजी कसा झाला? या संदर्भात सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन श्री दगाजी वाघ होते. व्यासपीठावर सरपंच बुरान तडवी, पाचोरा पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ललित वाघ , ग्रामपंचायत सदस्य तुषार आढाव ,प्रकाश चौधरी ,प्रवीण बाविस्कर ,रमेश चौधरी, शांताराम चौधरी, विष्णू चौध,री देवरे भाऊसाहेब, प्रमोद चौधरी, गुलाब चौधरी, हिम्मत चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी ,गोपाल चौधरी, ईश्वर चौधरी ,विकास चौधरी, बारकू चौधरी ,सुभाष चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री रमेश चौधरी यांनी,तरआभार प्रमोद चौधरी यांनी मानले.
त्यानंतर सर्व समाज बांधव ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री हरिभक्त परायण शांताराम महाराज शेंदुर्णीकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव भगिनी ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ हरिभक्त परायण पंडित महाराज तसेच महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.
----------------------------–----------------------------------------------
Post a Comment
0 Comments