Type Here to Get Search Results !

युवकांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे --- मा. जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील. स्वामी विवेकानंद व माँसाहेब जिजाऊ जयंती ग्रंथ दिंडीने साजरी


कुऱ्हे पानाचे -:-   दि. १४ जानेवारी - राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद हे केवळ हिंदुस्थानचे नव्हे तर समस्त जगाचे मार्गदर्शक आहेत. युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावेत. आजच्या युवकांना आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी या महापुरुषांचे विचार निश्चित उपयोगी आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले. वाचनासंबंधीच्या जन-जागृतीसाठी कुऱ्हे पानाचे येथिल स्वामी विवेकानंद वाचनालयातर्फे राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. जयंती  निमित्ताने वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या या ग्रंथ दिंडीला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथांचे - पुस्तकांचे पूजन जिल्हा परिषदेचे व नियोजन समितीचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. गावाच्या मुख्य राजमार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.  स्वामी विवेकानंद वाचनालय हे 14 वर्षांपासून  गावात वाचन संस्कृती टिकविण्याचे कार्य करीत आहे. यासाठी  वाचनालयाचे अध्यक्ष प्रदिप धांडे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव शिवाजी बरकले, खजिनदार युवराज पाटील, सदस्य बाळु महाजन, ज्ञानेश्वर पाटील, किशोर सोनवणे हे परिश्रम घेत असून कार्यरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार युवराज पाटील यांनी केले, सूत्रसंचालन सचिव शिवाजी बरकले यांनी तर आभार अध्यक्ष प्रदीप धांडे यांनी मानले.

                         यांची होती उपस्थिती

या प्रसंगी  माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, ग्रा.पं.सदस्य प्रमोद उंबरकर, पिंटू नागपुरे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष कालिदास कळसकर, जी. के. पाटील, सुनील जैन, प्रा. अरविंद  बावस्कर, भगवान जगताप, प्रमोद छाजेड, अशोक बडगुजर सर, संतोष रंदाळे, रामदास कोतवाल,  गावातील श्री विठ्ठल भजनी मंडळ, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments